ताज्या घडामोडीराष्ट्रिय

ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांच्या कार्यालयावर महापालिकेकडून कारवाई

कार्यालयावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक पोलिसांसह दाखल

नाशिक : वसंत गीते यांच्या कार्यालयावर महापालिकेच्या अनधिकृत विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. कारवाईच्या आधी कार्यालयातील महापुरुषांचे फोटो काढण्यात आले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हातात घेऊन या कारवाईचा निषेध केला. वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक पोलिसांसह दाखल झाले आहे.

ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी या कारवाईवर टीका केली आहे. ते म्हणाले की, एक एकाला टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही जागा एसटी महामंडळाची आहे. येथे महापालिकेचा काहीही सबंध नाही. अतिक्रमण कारवाई करायचे असेल तर एस टी महामंडळने काढावे. महापालिकेला अडचण येत असेल तर त्यांनी एसटी महामंडळाची पत्रव्यवहार करावा. अधिकार महामंडळाकडे आहेत. महापालिकेने केलेल्या कृतीबाबत गीते हे कोर्टात गेले आहे त्याची सुनावणी ३ तारखेला आहे. तरी सुद्धा अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नाही याचा आम्ही निषेध करतो. जागा महामंडळाची असल्याने महापालिकेला नोटीस बजावता येत नाही. ही केलेली कृती बेकायदेशीर आहे.

वसंत गिते म्हणाले की, या सर्व राजकीय सुडपोटी चाललेल्या कारवाई आहेत. मध्य नाशिकच्या आमदार पेटून उठला आहे. लोकसभेचा झळ इथपर्यंत पोहोचले आहे. महापालिकेने ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आणि आता १ वर्ष पूर्वी मोजली आहे. ३५ वर्षापासून माझे कार्यालय इथे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इथे आलेले आहेत. मुख्यमंत्री राजकीय पोटी ही कारवाई करण्यात होत आहे. आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. त्यांना सुबुद्धी देवो. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करू.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button