ताज्या घडामोडीराष्ट्रिय

स्वीडनमध्ये रंगली मंगळागौर!

गेल्या दोन वर्षांपासून सातासमुद्रापार स्वीडन येथील भारतीय महिला अतिशय उत्साहाने मंगळागौर साजरी करताहेत

स्वीडनः मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात.मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते.आता हेच भारतीय व्रत मंगळागौर सातासमुद्रापार स्वीडन येथील भारतीय महिला अतिशय उत्साहाने साजरे करत आहेत.

यावर्षी श्रावणातील मंगळवारी स्वीडनमध्ये मोठ्या थाटात रंगला. गोथनबर्ग महाराष्ट्र मंडळ यांनी मंगळागौरीचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम आयोजित केला होता. २०२३ सालापासून स्वीडन येथे हा मंगळागौरचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद देखील मिळाल्यामुळे या मंडळाने यावर्षीदेखील हाच कार्यक्रम आयोजित केला होता.

यापुढेही या कार्यक्रमाचे आयोजन नक्कीच करू, असे या महिलांनी यावेळी सांगितले. सर्व महिलांनी भरपूर खेळ खेळल्या मंगळागौरीच्या त्यांनी खूप धमाल मस्ती केली, अशी माहिती प्रणाली मानकर-पतके यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button