breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सुप्रिया सुळे सातव्यांदा ‘संसद रत्न’; 11 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचा होणार गौरव

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
प्राईम पॉईंट फाऊंडेशनने 11 खासदारांना ‘संसद रत्न अवार्ड 2022’ने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. त्या आता सातव्यांदा संसद रत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या 11 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील चार खासदार आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यामध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित यांचाही समावेश आहे. हा 12 वासंसद रत्न पुरस्कार सोहळा २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे.

याशिवाय भाजपचे तमिळनाडूमधून खासदार असलेले एचवी हांडे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. वीरप्पा मोईली यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारासाठी निवडलं गेलं आहे. विशेष म्हणजे या 11 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील चार खासदार आहेत.

कोण आहेत संसद रत्न?

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेटे), आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हीना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) यांना या 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

प्राईम पॉइंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष के श्रीनिवासन यांनी सांगितलं की, खासदारांच्या कामगिरीच्या आधारेच त्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये PRS इंडियाने प्रदान केलेल्या डेटाचा आधार घेण्यात आला. 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन 2021 च्या शेवटपर्यंतच्या त्यांच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button