breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

देशातील ‘या’ क्षेत्रात लवकरच १० कोटींहून अधिक नोकऱ्या होणार उपलब्ध!

Employment News : देशातील बांधकाम क्षेत्रामध्ये २०३० सालापर्यंत १० कोटींहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. नाईट फ्रँक इंडिया आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड सर्व्हेयर्स या दोन संस्थांनी संयुक्तपणे हा रिपोर्ट सादर केला आहे. बांधकाम हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र असून सध्या या क्षेत्रात ७.१ कोटींहून अधिक कामगार आहेत.

ही संख्या २०३० सालापर्यंत १० कोटींच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतातील बांधकाम क्षेत्राचं मूल्य सध्या ६५० बिलियन डॉलर्स एवढं आहे. हे २०३० सालापर्यंत वाढून १ ट्रिलियन डॉलर्स एवढं होईल, अशी शक्यताही या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. हा आकडा आणखी वाढवायचा असेल, तर देशात कुशल कामगारांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं या अहवालात नमूद आहे.

हेही वाचा – आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांचं विधानपरिषदेत स्पष्टीकरण; म्हणाले..

सध्या उपलब्ध असणाऱ्या ७.१ कोटी कामगारांपैकी तब्बल ८१  टक्के कामगार हे अकुशल असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. तर, केवळ १९ टक्के कामगार हे कुशल आहेत. डेव्हलपर्स आणि कंस्ट्रक्शन कंपन्यांकडून कुशल कामगारांची मागणी केली जात आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने, शैक्षणिक संस्थांनी आणि प्रशिक्षण संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button