TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

शाळेत धार्मिक गोष्टी बाजूला ठेऊ नये का?, हिजाब प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सवाल

तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला धर्मांचे पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र, विद्यार्थी शाळेत कोणतेही कपडे घालू शकतात का? शाळेत धार्मिक गोष्टी बाजूला ठेवल्या जाऊ नयेत का?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सोमवारी उपस्थित केला आहे.

हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात २३ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याची सुनावणी न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर पार पडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.

यावेळी न्यायालयाने म्हटलं की, विद्यार्थी मिनीज, मिडीज किंवा जे हवे ते कपडे घालून येऊ शकतात का? तुमच्याकडे धार्मिक हक्क असतील, पण हा हक्क तुम्ही शाळेचा गणवेश घालण्यास सांगणाऱ्या शैक्षणिक संस्थेत नेऊ शकता का? तुम्हाला हिजाब किंवा स्कार्फ घालण्याचा अधिकार असू शकतो. पण, गणवेश घालण्यास सांगणाऱ्या शैक्षणिक संस्थेत तुम्ही हा अधिकार घेऊन जाऊ शकता का?, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ सप्टेंबरला होणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button