Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! बाईकच्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट होऊन चालक गंभीर जखमी; पोलिसांकडून तपास सुरु
![Shocking! The driver was seriously injured when the bike's petrol tank exploded; Police start investigation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Bike-Fuel-Tank-Explodes.jpg)
नवी दिल्ली |
बाईकच्या टाकीचा स्फोटो होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी संध्याकाळी पंजाबमधील जलालाबादमध्ये ही घटना घडली आहे. स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
दुचाकीस्वार बुधवारी संध्याकाळी जुन्या सब्जी मंडी येथून बँक रोडच्या दिशेने निघाला होता. दुचाकीस्वार बँकेजवळ पोहोचला असताच अचानक त्याच्या दुचाकीच्या टाकीचा स्फोटो झाला. या स्फोटामुळे चालक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.