धक्कादायक! सासूच्या अंत्यविधीवरून घरी येताच सुनेचाही झाला मृत्यू
![धक्कादायक! सासूच्या अंत्यविधीवरून घरी येताच सुनेचाही झाला मृत्यू](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Shocking-Sune-also-died-while-returning-home-from-her-mother-in-laws-funeral.jpg)
नाशिक |
सध्या कोणावर काय प्रसंग ओढावेल याचा काही नेम नाहीये. असाच एक भयंकर प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. आजेसासुचा अंत्यविधी आटपून घरी कपडे वाळत घालत असतांना नातसुनेसोबत असं काही झालं की तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी गावात हा प्रकार समोर आला आहे. आकांक्षा कचवे असं मृत्यू झालेल्या सुनेचं नाव आहे. आजी सासू सुलकनबाई कचवे यांचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अंत्यविधी आटोपून घरी परतल्यानंतर आकांक्षा घरातील कपडे वाळत घालण्यासाठी गेली. यावेळी विजेच्या तारेचा शॉक लागल्याने तिचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. अवघ्या दीड वर्षांपूर्वी आकांक्षाचा विवाह झाला होता. आकांक्षाच्या मृत्यूने अर्धावरच संसाराचा डाव मोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे तर वीज कंपनीच्या गलथान कारभारामूळे निष्पाप नववाहितेचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.