धक्कादायक! महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; एकाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/mobile-porn.jpg)
नवी दिल्ली |
पाकिस्तानमधील एका महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी आणि धमकावल्याच्या गुन्ह्याखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. ज्या महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झालाय तिचं नाव सानिया आशिक असं आहे. सानिया यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केलीय. पाकिस्तानमधील एआरव्हाय या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार सानिया आशिक पाकिस्तानच्या मुस्लीम लीग नवाजच्या सदस्य आहेत. त्या पंजाब प्रांतातील तक्षशिला येथील आमदार आहेत. नुकताच पाकिस्तानमध्ये एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका रुममध्ये शूट करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला नग्नावस्थेत दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला आमदारच असल्याचा दावा केला जातोय. या महिला आमदाराच्या नावानेच हा व्हिडीओ व्हायरल होतोय. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर सानिया यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली.
सानिया यांनी यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी तपास यंत्रणांकडे टिकटॉक आणि अन्य सोशल नेटवर्किंग व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ संदर्भात एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सायबर विभागाकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान बुधवारी हा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. सध्या आरोपीच्या विरोधात वेगवगेळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. “त्याने माझे व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल करण्याबरोबरच सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. व्हिडीओत दिसणारी महिला माझ्यासारखी दिसते,” असा दावा सानिया यांनी एका ट्विटमधून यापूर्वीच स्पष्टीकरण देताना केलेला. “धमकावणारे शेकडो कॉल, टिकटॉकवरील अश्लील गाणी, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट आणि माझ्याशी संबंधित कोणतेही व्हिडीओ व्हायरल करुन माझी प्रतिमा खराब करण्याचं काम केलं जात आहे,” असा आरोप सानिया यांनी केलाय.
A targeted harassment strategy starting with hundreds of threatening calls,3rd grade songs on tiktok, replusive posts on fb, random clips associated to me;has now culminated at using picture of my father literally during last hours of his life,moments I can never erase frm memory
— Sania Ashiq (@SaniaaAshiq) October 26, 2021
सानिया या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आणि पीएमएल-एनच्या प्रमुख नेत्या मरियम नवाज यांच्या निकटवर्तीय आहेत. सानिया या पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन टीका करताना दिसतात. सध्या मात्र त्या नको त्या कारणासाठी चर्चेत आहेत.