breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! ऑक्सिजनचा दाब कमी पडल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली – कोरोनाच्या चौथ्या लाटेत दिल्लीकरहोरपळलेले असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी करण्यासाठी एकाच रुग्णालयातील तब्बल २० जणांचा मृत्यूू झाला आहे. दिल्लीच्या जयपूर गोल्डन रुग्णालयात प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येही अशीच घटना घडली होती.

दिल्लीत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने नाशिकमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला होता. असाच प्रकार जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये घडला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने शुक्रवारी रात्री २० रुग्णांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचे डी.के. बालुजा यांनी सांगितलं.

सध्या रुग्णालयात केवळ अर्धा तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहिल्याची माहितीही रुग्णालयाने दिली आहे. सध्या २०० रुग्ण उपचार घेत असून, वेळीच ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांचे प्राण जाऊ शकतात अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

३५० रुग्णांचं मरण तात्पुरतं टळलं…

दिल्लीतील सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनाचा तुटवडा भेडसावत असून, बात्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी ३५० रुग्णांचा जीव धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ २५ मिनिटं पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा रुग्णालयात शिल्लक होता. रुग्णालयाने दिल्ली सरकारला एसओएस संदेश पाठवला. त्यानंतर दिल्ली सरकारकडून तातडीने एक ऑक्सिजन टँकर पाठवण्यात आला. रुग्णालयाला ८ हजार लिटर ऑक्सिजनची गरज असताना केवळ ५०० लिटरच ऑक्सिजन पुरवण्यात आला असून, केवळ १२ तासच पुरेल इतका साठा असल्याचं रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एससीएल गुप्ता यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ३५० रुग्णांचं मरण तात्पुरतं टळलं अशीच भयावह स्थिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button