TOP Newsताज्या घडामोडी

शिंदे यांचीच शिवसेना खरी ; गिरीश महाजनांचा दावा; उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. शिंदे यांच्याकडे  ४५ आमदार आहेत. शिवाय, अठरापैकी १२  खासदारही आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कितीही प्रयत्न केले, कोणतेही अर्ज भरून दिले, तर मला वाटत नाही की त्यांच्या बाजूने निकाल लागेल, असे मत ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

जामनेर येथे जी. एम. फाउंडेशनतर्फे दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते स्वरसंध्या महोत्सव-२०२२ हा भव्य संगीतमय कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान मंत्री महाजन यांची मुलाखतही गुप्ते यांनी घेतली, त्यावेळी त्यांनी आपला राजकीय जीवनप्रवासही उलगडून दाखवीत विरोधकांवर जोरदार टोलेबाजीही केली. त्यांनी राजकीय जीवनप्रवासाचा पट उलगडून दाखविला. शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक, भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ता, भाजपमध्ये कार्यकर्ता यांपासून ते १९९२ मध्ये सरपंचपदी निवड झाल्यापासून सहाव्यांदा आमदार ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास उलगडला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button