सीरम इन्स्टिट्यूटला ७ ते ११ वर्षांच्या मुलांवर लसीच्या चाचणीला परवानगी
![Mumbai Municipal Corporation ready to vaccinate children in the age group of 15 to 18 years, waiting for the Centre's regulations](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Vaccine-1-2.jpg)
नवी दिल्ली – भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलापाठोपाठ आता भारतातील सीरम इन्स्टिट्यूटच्या लहान मुलांवरील लसीच्या चाचणीला भारताच्या केंद्रीय औषध मानक नियामक मंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ७ ते ११ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी केली जाणार आहे. मात्र या चाचण्यांना सुरुवात २०२२ मध्ये पहिल्या तिमाहीत होणार आहे. यासाठी सीरमची कोवोवॅक्स ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात लाँच होणार आहे. ही लस १२ वर्षांखालील मुलांसाठी वापरली जाईल.
या चाचणीसाठी १० ठिकाणी २९० मुलांचा समावेश केला जाईल. ज्यात १२ ते १७ वयोगटातील आणि २ ते ११ वयोगटातील प्रत्येकी ४६० मुलांचा समावेश करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने २ ते १७ वर्षांपर्यंत मुलांवर कोवोवॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी काही अटींसह परवानगी देण्याची शिफारस केली आहे. अलिकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.