Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

PNG कनेक्शनधारकांना LPG सिलिंडर रिफिल नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Gas Cylinder New Rules | आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात आहे. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र, LPG गॅस सिलिंडर साठी काही शहरांत नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वच राज्यात व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्याला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे. तसेच एलपीजी गॅसची टंचाई होऊ नये म्हणून केंद्र सरकारने आता महत्वाचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन (पाईप गॅस) असतील त्यांना LPG गॅस सिलिंडर देण्यास परवानगी दिली जाणार नाही.

हेही वाचा       :                  पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद 

दरम्यान, आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जाहीर केलं आहे की पाईपद्वारे गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना एलपीजी सिलिंडर रिफिल देण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे आता अशा ग्राहकांना घरगुती एलपीजी कनेक्शन परत करावं लागू शकतं. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.

केंद्र सरकारने म्हटलं की, “पाईपद्वारे गॅस कनेक्शन असलेल्या आणि घरगुती एलपीजी कनेक्शन असलेल्या कोणत्याही व्यक्तीने घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवू नये किंवा कोणत्याही सरकारी तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकांकडून घरगुती एलपीजी सिलिंडरचं रिफिल घेऊ नये. तसेच अशा व्यक्तींना त्यांचं घरगुती एलपीजी कनेक्शन परत करावं लागेल.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button