सौदी अरामकोने क्रुड ऑईलच्या दरात केली वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार
![Saudi Aramco raises crude oil prices; Petrol-diesel will become more expensive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/7900c664-petrol-diesel-2.jpg)
नवी दिल्ली | प्रतिनिधी
सर्व सामान्यांना महागाईने हैराण केले असतानाच सौदी अरामकोने आशियासाठी देण्यात येणार्या क्रुड ऑईलच्या दरात वाढ केली आहे. तसेच केेंद्र सरकारनेही गेले 90 दिवस क्रुड ऑईलचे दर प्रचंड वाढलेले असतानाही निवडणुकीमुळे दरवाढ रोखली आहे. यामुळे मार्चमध्ये निवडणूक निकाल जाहीर होताच पेट्रोल-डिझेलच्या दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका सामान्यांना बसणार असून महागाईची झळ आणखीनच वाढणार आहे.
सौदी अरामकोने आशियातील तेल ग्राहकांसाठी क्रूड ऑईलच्या दरात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये 60 सेंट प्रति बॅरल दरामध्ये वाढ केली आहे. रॉयटर्सने जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये, किमतीतील ही वाढ आशियातील मजबूत मागणी दर्शविते. यामुळे कंपन्या गॅसोइल आणि जेट इंधनात जास्त फायदा कमावत असल्याचे दिसते, असे म्हटले आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे जर आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उत्तर पाहायला मिळाला तर याचा थेट परिणाम भारतातील इंधनांच्या किमतीवर पडू शकतो. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. 2 डिसेेंबर 2021 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झालेला नाही. केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत.