ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

संगमनेर तालुक्याच्या अस्मितेसाठी २५ हजार नागरिकांचा विराट मोर्चा

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर एकवटला

संगमनेर : राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेर तालुका एकवटला. सुमारे २५,००० नागरिकांनी शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने भव्य विराट शांती मोर्चा काढून आपली अस्मिता, संस्कृती आणि नेतृत्वाच्या पाठीशी उभे असल्याचा ठाम संदेश दिला.

स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज, पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी, वारकरी पंथ आणि विविध राजकीय-सामाजिक संघटनांच्या सहकार्याने ‘सद्भावना शांती मोर्चा’ आयोजित करण्यात आला. मोर्चा यशोधन कार्यालय ते नवीन नगर रोड असा काढण्यात आला.

“गावगुंडांचा बंदोबस्त करा, अन्यथा जनतेच्या उद्रेकाला जबाबदार प्रशासन आणि सत्ताधारी असतील,” असा इशारा देत बाळासाहेब थोरात म्हणाले, “संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही हिंदू धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे खरे पाईक आहोत. गोडसेच्या विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्यांना संगमनेरकडून कधीही पाठिंबा मिळणार नाही. तसेच, “तालुक्यात दहशत वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधीला हत्यार म्हणून वापरले जात आहे. गुंडगिरीला पाठबळ देणारे, धर्माचा केवळ देखावा करणारे हे लोक तालुक्याच्या विकासविरोधी षडयंत्रात सहभागी आहेत,” असा आरोप थोरात यांनी केला.

हेही वाचा :  देवकर प्लाझा फसवणूक प्रकरण : ५४.५० लाख रुपयांची फसवणूक

सत्यजित तांबे यांचा ठाम पाठींबा :
“संगमनेरच्या विकासाचे श्रेय बाळासाहेब थोरात यांना जाते. हिंदुत्व हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहे. कीर्तनाच्या नावाखाली गोडसेला महात्मा म्हणणाऱ्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे आमदार सत्यजित तांबे म्हणाले. “मीही आमदार आहे. कार्यकर्त्यांना घाबरायची गरज नाही. मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे,” असा विश्वास त्यांनी दिला.

डॉ. जयश्रीताई थोरात यांचा सवाल :
“खोट्या गुन्ह्यांतून तरुणांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. आपण खरे हिंदू आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. गोडसे नाही, तर शिवरायांचा विचार आमचा आदर्श आहे,” असे त्या ठामपणे म्हणाल्या.

प्रशासनाला थोरात यांचा खडसाव :
मोर्चात सहभागी होण्यासाठी गावागावांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्याने बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला फटकारले. “तुम्ही कोणाच्या घरचे घरगडी आहात का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी या अन्यायाविरुद्ध जनतेच्या भावना स्पष्ट केल्या. घुलेवाडी येथे घडलेली घटना हे नियोजित षड्यंत्र होते, असा आरोप करत थोरात यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत संबंधित व्हिडिओ व पुरावे जनतेसमोर सादर केले. संग्राम भंडारे याने खोटे बोलून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित जनसमुदायाने जोरदार निषेध केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button