Samsung ची धमाल , Apple वर केली मात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/samsung-apple.jpg)
सॅमसंगने (Samsung) अॅपलवर (Apple) मात करत शानदार कामगिरी केलीये. मोबाइल प्रोसेसर मार्केटमध्ये अॅपलवर मात करत सॅमसंग हा तिसरा सर्वात मोठा चिपसेट निर्माता ब्रँड ठरला आहे. Counterpoint Research च्या रिपोर्टनुसार, सॅमसंग Exynos प्रोसेसर आता चिपसेट मार्केटमध्ये तिसरा सर्वात मोठा ब्रँड ठरलाय. चिपसेट मार्केटमध्ये सॅमसंगची हिस्सेदारी 14.1 टक्के झाली असून त्यांनी अॅपलला चौथ्या स्थानावर ढकललंय.
एकीकडे सॅमसंगच्या हिस्सेदारीत 2.2 टक्के वाढ झाली असताना अॅपलच्या हिस्सेदारीत 0.5 टक्के घट झाली असून 13.1 मार्केट शेअरसह ते चौथ्या क्रमांकावर आहेत. अमेरिका आणि भारतात सॅमसंगची कामगिरी दमदार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अमेरिका आणि भारतात मिळालेल्या शानदार प्रतिसादाचा कंपनीला तिसरं स्थान मिळवण्यात मोठा हातभार लागला. कंपनी आपल्या अनेक फ्लॅगशिप फोनमध्ये Exynos प्रोसेसरचा वापर करते.
Qualcomm पहिल्या क्रमांकावर कायम :-
चिपसेट मार्केटमध्ये Qualcomm एक नंबरवर कायम असून मार्केटमधील हिस्सेदारी 33.4 टक्के झाली आहे, तर चिपसेट मार्केटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर 24.6 टक्के मार्केट शेअरसह मीडियाटेकचा क्रमांक लागतो.