Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षात रशियाची एन्ट्री; शांततेसाठी प्रस्ताव

Russia Mediation Iran 4 Conditions To US-Israel | अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननंतर आता रशियानेही मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तिन्ही देशांमधील तणाव लवकरात लवकर संपवण्यासाठी आवाहन करत मॉस्कोतून मध्यस्थीचा प्रस्ताव दिला असल्याचे वृत्त समोर आले आहे.

रशियाची प्रसिद्ध वृत्तसंस्था इंटरफाक्सने दिलेल्या माहितीनुसार, युद्धग्रस्त प्रदेशात शांती प्रस्थापित करण्यासाठी रशिया प्रयत्न करण्यास तयार असून त्यासाठी स्थानिक नेत्यांच्या संपर्कात राहण्याचा निर्धार पुतिन यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांशी बोलताना मध्यपूर्वेत वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुतिन प्रादेशिक नेत्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे स्पष्ट केले. “लष्करी कारवाई थांबावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित नेत्यांशी संवाद साधला जात आहे,” असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा      :            नासाचे ‘आर्टेमिस-२’ मिशन लाँच; ५० वर्षांनंतर मानवाची चंद्राकडे ऐतिहासिक झेप

इराणच्या शांततेसाठी चार प्रमुख अटी

रशियातील इराणचे राजदूत काझेम जलाली यांनी रशियन वृत्तसंस्था TASSशी बोलताना शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलसमोर चार प्रमुख अटी ठेवल्या आहेत.

इराणच्या चार अटी पुढीलप्रमाणे :

  1. दहशतवादी हल्ले पूर्णपणे थांबवावेत.
  2. भविष्यात युद्धाची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत विश्वासार्ह हमी द्यावी.
  3. युद्धामुळे झालेल्या भौतिक आणि नैतिक नुकसानीची पूर्ण भरपाई करावी.
  4. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणच्या कायदेशीर अधिकारक्षेत्राचा आदर राखावा.

१५ कलमी प्रस्ताव इराणने यापूर्वी नाकारला

दरम्यान, अमेरिकेने शांततेसाठी पाकिस्तानच्या माध्यमातून १५ कलमी प्रस्ताव इराणसमोर मांडला होता. मात्र, तो वास्तववादी नसल्याचे कारण देत इराणने हा प्रस्ताव नाकारला होता. आता शांतता चर्चेसाठी तयारी दर्शवताना इराणने प्रस्तावातील अटी राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या शक्य व वास्तवदर्शी असाव्यात, असे मत व्यक्त केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button