Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

नासाचे ‘आर्टेमिस-२’ मिशन लाँच; ५० वर्षांनंतर मानवाची चंद्राकडे ऐतिहासिक झेप

Artemis 2 Mission Launch | अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने ‘आर्टेमिस-२’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीरांना चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी अंतराळात यशस्वीपणे पाठवले आहे. भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी ४:०५ वाजता फ्लोरिडा राज्यातील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रचंड शक्तिशाली एसएलएस (Space Launch System) रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

या मोहिमेद्वारे तब्बल ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. यापूर्वी १९६० आणि १९७० च्या दशकात अपोलो मोहिमेद्वारे १२ अंतराळवीरांना चंद्रावर उतरविण्यात आले होते. त्यानंतर अनेक अंतराळवीरांनी अंतराळात प्रवास केला असला, तरी पृथ्वीपासून इतक्या दूर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा      :              महाराष्ट्रात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’! पुणे, नाशिकसह १० जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा; उकाडाही वाढणार

‘आर्टेमिस-२’ मोहिमेत अमेरिकेचे अंतराळवीर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि क्रिस्टीना कोच तसेच कॅनडाचे जेरेमी हॅन्सेन सहभागी आहेत. या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे क्रिस्टीना कोच या चंद्राच्या परिसरात पोहोचणाऱ्या पहिल्याच महिला अंतराळवीर ठरणार आहेत.

या मोहिमेद्वारे अंतराळवीरांना चंद्राजवळ पोहोचण्यासाठी सुमारे तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार असून, संपूर्ण मोहिमेचा कालावधी अंदाजे दहा दिवसांचा आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश भविष्यातील मानवाच्या चंद्रावर उतरण्याच्या मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी घेणे आणि अंतराळ संशोधनाला नवी दिशा देणे हा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button