अयोध्येतील १४ कोस परिक्रमात धावपळ
![Running in 14 kos parikrama in Ayodhya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-02-at-2.56.39-PM.jpeg)
श्वास नीट घेता न आल्याने भाविक बेशुद्ध
अयोध्या । महाईन्यूज ।
एकीकडे परिक्रमादरम्यान गोंधळ झाला असला तरीही यामध्ये कोणताही खंड पडला नाही. १४ परिक्रमा पुढे सरकत गेली. परिक्रमाचा मुहुर्त रात्री १२.४७पासून होता. मात्र, भाविकांनी याआधीच परिक्रमाला सुरुवात केली. मुहूर्त सुरू झाल्यानंतर, रामनगरी येथे ४२ कोसापर्यंत गर्दी जमा झाली होती. गर्दी एवढी झाली होती की पोलिसांनाही ही गर्दी नियंत्रण करणं असह्य झालं होतं.
राम नगरी अयोध्येत १४ कोस परिक्रमाला सुरुवात झाली आहे. बुधवारी ही परिक्रमा पुढे सरकली. मात्र, मंगळवारी रात्री १.३० वाजता हनुमान गुफा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे या परिक्रमादरम्यान काहीवेळ गोंधळ निर्माण झाला. या गोंधळात काही वृद्ध भाविकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त समोर येत आहे.
या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आलेले दंडाधिकारी लक्ष्मण प्रसाद यांनी सांगितलं की, भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना तत्काळ तैनात करण्यात आले. तसंच, रुग्णवाहिकांमधून बेशुद्ध पडलेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्याने वृद्ध भाविक बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
एकीकडे परिक्रमादरम्यान गोंधळ झाला असला तरीही यामध्ये कोणताही खंड पडला नाही. १४ परिक्रमा पुढे सरकत गेली. परिक्रमाचा मुहुर्त रात्री १२.४७पासून होता. मात्र, भाविकांनी याआधीच परिक्रमाला सुरुवात केली. मुहूर्त सुरू झाल्यानंतर, रामनगरी येथे ४२ कोसापर्यंत गर्दी जमा झाली होती. गर्दी एवढी झाली होती की पोलिसांनाही ही गर्दी नियंत्रण करणं असह्य झालं होतं.
आज, बुधवारी सकाळी सूर्योदयानंतर गर्दी कमी झाली. दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडल्याने यंदा परिक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. यामध्ये जवळपास ३० लाख लोक जमले होते, असं सांगण्यात येतंय. परिक्रमामध्ये सहभागी झालेल्या भाविकांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली होती. १४ कोसपर्यंत ३६ ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. जेणेकरून परिक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना स्वास्थ्यासंबंधी काही तक्रारी निर्माण झाल्यास ते तत्काळ उपचार घेऊ शकतील.