२ हजार रुपयांच्या नोटा पोस्टाद्वारे रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात पाठवता येणार, RBI ची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/2000-Note-780x470.jpg)
RBI : २ हजार रुपयांच्या नोटा बँकांतून परत करण्याची मुदत ८ ऑक्टोबर रोजी संपली. मात्र तुम्ही जर आत्तापर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केलेल्या नसतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. २ हजार रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नोंदणीकृत पोस्टाद्वारे रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात पाठवू शकता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक रोहित पी म्हणाले, आम्ही ग्राहकांना सर्वात सोयीस्कर आणि सुरक्षित रीतीने त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी पोस्टाद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली असून, २ हजार रुपयांच्या नोटा पाठवण्यास मदत मिळणार आहे. यामुळे अनेकांचा त्रास वाचणार आहे.
हेही वाचा – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत राजकारणात प्रवेश करणार?
2000/- Notes continue to be legal tender & can be exchanged from Post Office or offices of RBI. pic.twitter.com/le5n7XtQHm
— Adv Pranshu Taneja (@TanejaAdv) November 2, 2023
लोक अजूनही त्यांच्या १९ प्रादेशिक कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन किंवा पोस्टाद्वारे २ हजार रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. यासाठी आरबीआयने फॉर्मेटही जारी केला आहे, अशी माहिती RBI ने एका प्रेस नोटद्वारे दिली आहे.
तुम्हाला येथे दिलेल्या फॉर्मच्या आधारे RBI शाखेत २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. येथे नमूद केलेल्या अर्जामध्ये सर्व आवश्यक तपशील योग्यरीत्या भरून तुम्ही ही नोट इंडिया पोस्टच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून पाठवू शकता.