breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीत सेवा स्मृती उद्यान उभारणीचा संकल्प

सांगली |

माझी वसुंधरा अंतर्गत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार झाडांचे रोपण करून सेवा स्मृती उद्यान उभारणीचा संकल्प सोडला आहे. महापालिकेत कार्यरत असलेले कर्मचारी आपल्या आठवणी कायम राहाव्यात यासाठी या उद्यानात वृक्षलागवड करणार आहेत. याचा प्रारंभ आयुक्त नितीन कापडणीस यांनी वृक्षलागवड करून केला.

सांगली मिरज रोडवरील वसंतबागमधील महापालिकेच्या २ एकर जागेवर एक  स्मृती उद्यान साकारण्यात येत आहे. या उद्यानात महापालिका सेवेत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या सेवेची आठवण म्हणून एक वृक्ष लावण्याची ही संकल्पना आहे. या उपक्रमात महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठयम उत्साहाने सहभाग घेत आपल्या आठवणींचे एक झाड या उद्यानात लावले आहे. महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वखर्चातून २ एकर जागेत २ हजार झाडांचे रोपन केले आहे. या उपक्रमाची सुरवात खुद्द मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी वृक्षारोपण करत केली.

तसेच उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आयुक्त कापडणीस म्हणाले की,  महापालिका क्षेत्र हरित व्हावे आणि वसुंधरा संवर्धन व्हावे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. यामुळे एक हरित आठवण उद्यान म्हणून हा परिसर लौकिकास येईल. उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून या सर्व उपक्रमाचे आयोजन केले होते. या उद्यानात जागोजागी महापालिकेच्या विविध विभागांचे फलक लावण्यात आले. या फलकांचा आजूबाजूला त्या त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ५० ते ७० झाडांचे रोपन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button