breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राज्य सरकारी कर्मचार्यांना दिलासा; एनपीएसवरील कर 10 वरुन 14 टक्के
![Relief to state government employees; Tax on NPS from 10 to 14 percent](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/money-extor_.jpg)
नवी दिल्ली | प्रतिनिधी
केेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारच्या कर्मचार्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेतील (एनपीएस) योगदानावर 14 टक्के सुट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेतील योगदानावर 14 टक्क्यांंपर्यंत कर सवलत मिळते. तर राज्य सरकारी कर्मचार्यांना 10 टक्के कर सवलत मिळते. मात्र यात बदल करून राज्य सरकारला 14 टक्के कर सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचार्यांनाही केंद्र सरकारी कर्मचार्यांप्रमाणे राष्ट्रीय पेन्शन योजनेतील योगदानावर समान कर सवलत मिळणार आहे.