breaking-newsताज्या घडामोडी

RecordBreak: वय ५० वर्षे…८ जिल्हे…६०० गुन्हे…१५ वर्षे तुरूंगात तरीही चोरी हाच त्याचा धंदा जोमात

सोलापूर | महाईन्यूज

महाराष्ट्रात ठिकठिकाणी बँक व घरफोड्या करणाºया दोन अट्टल गुन्हेगारांना फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे. दोघांकडून एक किलो सोने, चांदीचे साहित्य, रोख रक्कम, दोन मोटर कार, एक मोटरसायकल व तीन मोबाईल असा एकूण ५५ लाख ५७ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

राजेंद्र शिवाजी बाबर (रा. किकली, ता. वाई, जि. सातारा मूळगाव आसनगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा सध्या सोजर इंग्लिश स्कूलच्या मागे परांडा रोड, बार्शी, जि. सोलापूर), राजकुमार पंडित विभूते (वय ३८, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जबरी चोरी व घरफोडी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हेगारांच्या हालचाली पडताळण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर आदी जिल्ह्यांत सुमारे ६०० दरोडे व जबरी चोरी करणारा नामचिन गुन्हेगार राजेंद्र बाबर हा पोलिसांच्या रडारवर होता.

केगाव येथील जयभवानी हॉटेल परिसरात चोरीतील दोघे वावरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांना मिळाली होती. माहितीवरून केगाव येथील जयभवानी हॉटेल परिसरात सापळा लावण्यात आला होता. राजेंद्र बाबर व राजकुमार विभूते हे दोघे पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पकडण्यात आले. दोघांच्या ताब्यातील दोन कार, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य मिळून आले. सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button