breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

स्टार चिन्ह असलेल्या नोटा नकली आहेत का? RBI चे स्पष्टीकरण

सोशल मीडियावर सध्या नोटांबाबत अनेक संभ्रम निर्माण केले जात आहेत. सध्या चलनात असेली ५०० ची नोट खूप चर्चेत आहे. या नोटेवर असलेल्या स्टार बाबत शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने एक परिपत्र काढत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. स्टार असलेली नोट ही वैध नसल्याचं यात म्हटलं आहे.

रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटले आहे की, काही वेळा काही नोटा छापखान्यात चुकीची छाप पडते. त्याच नोटेच्या बदल्यात ज्या इतर नोटा छापल्या जातात, त्या नोटेवरील नंबर पॅनेलमध्ये तोरेचे चिन्ह जोडले गेले आहे. अनुक्रमांक असलेल्या नोटांच्या बंडलमध्ये चुकीच्या पद्धतीने छापलेल्या नोटांच्या बदल्यात तारांकित चिन्ह असलेल्या नोटा जारी केल्या जातात. पण ही बनावट नोट नाही.

हेही वाचा – जीवनात स्वतःला ‘या’ ६ गोष्टींची शिस्त लावून घेतली तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल..

स्टार चिन्ह असलेली नोट ही इतर नोटेप्रमाणेच वैध आहे. त्याचे तारेचे चिन्ह फक्त सूचित करते की ते बदललेल्या किंवा पुनर्मुद्रित नोटच्या जागी जारी केले गेले आहे. तारेची ही खूण नोटची संख्या आणि त्यापुर्वी प्रविष्ठ करावयाची अक्षरे यांच्यामध्ये ठेवली जाते. ही प्रणाली २००६ मध्ये सुरू करण्यात आली, असं आरबीआयने म्हटलं आहे.

तसेच ज्याच्याकडे २००० रूपयांची नोट आहे तो ती आपल्या बँक खात्यात जमा करू शकतो किंवा बँकेत दुसरी नोट बदलून घेऊ शकतो. बँकांना २००० रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची सुचना देण्यात आली आहे, असं आरबीआय गव्हर्नर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button