सोन्याचा दरवाढीचा झेंडा तर चांदीत चढउतार
अमेरिकामधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्यानतंर शेअर बाजारांना उधाण
![rate, rise, flag, silver, America, President, Election, Donald Trump, Market, Udhan,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/dorlad-trump-780x470.jpg)
अमेरिका : अमेरिकामधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. त्यानंतर जगभरातील शेअर बाजार, व्यापार, सराफा बाजारांना उधाण आले. ट्रम्प हे स्वतः मोठे उद्योजक आहे. त्यांच्या उद्योगाचा पसारा संपूर्ण जगभर पसरला आहे. सराफा बाजारात संध्याकाळी सोने वधारले. तर चांदीने सपशेल माघार नोंदवली. मौल्यवान धातुनी दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला आहे. दिवाळीत त्यामध्ये चढउताराचे सत्र दिसून आले. या आठवड्याच्या सुरुवातीला घसरण नोंदवण्यात आली होती. तर आता किंमत वाढली आहे.
या आठवड्यात चढउताराचे सत्र
गेल्या आठवड्यात सोने 2,000 रुपयांनी महागले होते. त्यात 770 रुपयांची घसरण झाली होती. या मंगळवारी सोने 150 रुपयांनी उतरले होते. तर बुधवारी किंमत 150 रुपयांनी वाढली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मागील आठवड्यात चांदीत दोन हजारांची भर पडली तर तीन हजारांनी किंमती उतरल्या होत्या. या आठवड्यात चांदीत मोठा बदल दिसला नाही. तर 5 नोव्हेंबर रोजी चांदी 1 हजार रुपयांनी घसरली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,136, 23 कॅरेट 77,823, 22 कॅरेट सोने 71,573 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,602 रुपये, 14 कॅरेट सोने 45,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,901 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनहे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.