“आमदार रोहित पवार एक दिवस येतात आणि १०-१५ फ़ोटोकडून रोज कार्यक्रम घेतल्याचा आव आणतात”
![Rohit Pawar and Ram Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/रोहित-पवार-आणि-राम-शिंदे-.jpg)
जामखेड: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार असणारे रोहित पवार हे एक दिवस मतदारसंघात येतात आणि १०-१५ फोटो काढून लगेचच निघून जातात. हे सर्व झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करून रोज कार्यक्रम घेतात असे लोंकाना दाखवतात असा आरोप राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केला आहे. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या पुढाकारातून झालेल्या विविध विकासकामांचे उद्धघाटन राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राम शिंदे यांनी सदस्य सुनीता खेडकर यांच्या कामाचे कौतूक करताना रोहित पवरांवर टीका केली आहे. राम शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे या,दार रोहित पवार यांना मी मतदारसंघातील कामांबद्दल अनेक प्रश्न विचारले मात्र रोहित पवार यांच्याकडून मला एकही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अजूनही मिळालेले नाही. माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला ते घाबरतात का ? असा सवाल देखील शिंदेनी उपस्थित केला आहे. जलयुक्त शिवार कामाची चौकशी कर्जत तालुक्यातच जास्त सुरु आहे मात्र यातून काहीही निष्पन्न होणार नाही असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे.
मागील सरकारच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र चौकशी ही आपल्या तालुक्यातच जास्त प्रमाणात सुरु आहे. ती कोणामुळे केली जात आहे आणि कशासाठी केली जात आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. यामध्ये काहीही आढळून येणार नाही आणि त्यावेळी झालेली सर्व जलसंधारणाची कामे ही शेतकऱ्यांच्या हिताकरिता झालेली होती. गावात सुरु असणारे पाण्याचे टँकर बंद झाले, पाणी उपलब्ध झाल्याने पिके देखील चांगली आली आणि ही काम अत्यंत योग्य पद्धतीने झालेली आहेत. त्यामुळे माझे आव्हान आहे की चौकशी कराच असं आव्हान देखील राम शिंदे यांनी दिल आहे.