![Raigad Vishwajanani, Bank, closed, one sensation, customers, under feet, the ground moved,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/raigad-1-780x470.jpg)
अलिबाग : बाजारपेठेत काही महिन्यांपूर्वी रायगड विश्वजननी भारत निधी अर्बन बँक सुरू होती.बँकेच्या व्यवस्थापक संचालकांनी नेमलेल्या एजंट मार्फत भुरळ घालती.दुकानदारांनी दिवसभरात मिळणार पैसा जमा करीत होते.काही दिवसांपासून एजंट पैसे जमा करायला का येत नाही, यासंबंधीची चौकशी करण्यासाठी बँकेत गेले.परंतु बँकेच्या मुख्य दरवाज्याला कुलूप दिसले, खातेदारांनी आजूबाजूला चौकशी केली असता अनेक दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळताच खातेदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
बँक का बंद आहे? यासंदर्भातील माहिती मिळाली नसल्यामुळे बँकेच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई करून आमचे पैसे मिळून द्यावे, अशी मागणीचा तक्रारी अर्ज खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शीतल राऊत यांच्याकडे केली आहे.खातेदारांचे पैसे बुडाल्याने खालापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
खोपोली शहरात आरिहांत टॉवर डी येथे एका गाळ्यात बँकेचे कार्यलय सुरू केले होते.छोटे मोठे दुकाणदारांनी दररोजची रक्कम गोळा करण्यासाठी बँके मार्फत एजंट नेमून खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात बँकेची जाहिरात करून या बँकेचे मुख्य ऑफिस कर्जत शेळू येथे असल्याचे ग्राहकांना सांगितले होते. त्यामुळे अनेक दैनंदिन बचत खाते काढून त्यात रोजची रक्कम वसुली केली वर्ष भरात एक रकमी व्याजसह रक्कम मिळेल या आशेवर असणाऱ्या ग्राहकांना बँक बंद झाल्याची माहिती मिळताच मोठा धक्काच बसला. अनेक ग्राहक चौकशीसाठी बँकेत गेले, परंतू बँकेला टाळा असल्याने अनेक महिला ग्राहकांनी आरडाओरडा केला. त्याच वेळेस दररोज दैनंदिन रक्कम घेण्यासाठी येणारे एजंट यांना बोलविण्यात आले.त्यांना ८ एप्रिलला अचानक बँकेला टाळे असल्याचे माहिती मिळाली.एजंट लोकांचा काम केलेले पगार ही दिले नसल्याचे ग्राहकांना सांगीतले.
त्यांनतर बँकेचे मॅनेजर मल्लारी सूर्यवंशी यांना दूरध्वनी मार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनेक ग्राहक आर्थिक अडचणीत आले आहेत, त्यामुळे या बँकेच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई व्हावी यासाठी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. या तक्रारीत आमचे पैसे मिळून द्यावे, अशी मागणी करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू आहे. लवकरच दोषींवर कारवाई होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे. मात्र या बँकेचे व्यवस्थापन अधिकारी मल्लारी सर्यवंशी यांच्याशी दूरध्वनी मार्फत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.