Breaking-newsताज्या घडामोडी

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे सभासदांना १२.५ टक्के लाभांश जाहीर

अलिबाग |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी  सभासदांना १२.५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.  बँकेने सन २०२०-२१ या वर्षांमध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करीत ३८.०४ कोटी इतका ढोबळ नफा मिळविलेला असून रु.२३.३२ कोटी इतका निव्वळ नफा बँकेला झालेला आहे.  रायगड जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्यची बँक असून जिल्ह्यतील सहकारी संस्था ज्यामध्ये पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच इतर सर्व सहकारी संस्था यांच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान देत आलेली आहे.  त्यामुळे सर्व सहकारी संस्थांनी एकत्रित ध्येय धोरणाने काम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी बँकेच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केले.

यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, शंकराव म्हात्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेचे सर्व संचालक, बँकेतील अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते. यावर्षी बँकेने करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार निवडक सभासदांना सभेमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. सर्व सभासदांसाठी सभेचे नियोजन ऑनलाईन पद्धतीने देखील केले होत.  त्यामुळे जिल्ह्यतील सभासदांनी यावेळी दोन्ही माध्यमातून आपला सहभाग नोंदविला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी बँकेच्या कामगिरीबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावर्षी ३ हजार ६५० कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केला केला आहे.  यात २ हजार ३५९ कोटींच्या ठेवी तर १ हजार २९५ कोटींचे कर्जवाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले.  आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखत बँकेने अ ऑडीट वर्ग मिळविलेला आहे.  बँकेने आजवर २०हजार बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण साधत २ लाखांपेक्षा अधिक महिलांना बँकिंग प्रवाहामध्ये आणण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी केलेला आहे. यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाले. नाबार्ड तसेच रिझव्‍‌र्ह बँक यांच्या नियमांचे तंतोतंत पालन करून बँकेची वाटचाल सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button