पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Amit-Satam-780x470.jpg)
Republic Day 2025 : आज भारत आपला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो मुख्य पाहुणे म्हणून यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन उत्सवांमध्ये सहभागी झाले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! आज आपण आपल्या गौरवशाली प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यानिमित्ताने आम्ही त्या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना विनम्र अभिवादन करतो, ज्यांनी आपल्या संविधानाचा मसुदा तयार करून आपला विकास प्रवास लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकात्मतेवर आधारित आहे. हा राष्ट्रीय उत्सव आपल्या संविधानाची मूल्ये जपण्याची तसेच मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नांना बळकट करण्याची इच्छा आहे.”
हेही वाचा : पुण्यातील पुष्प प्रदर्शनाची परंपरा युवकांनी जपावी; सुहास दिवसे
दरम्यान, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निमलष्करी दलाच्या ७० तुकड्या, १५ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण दिल्लीवर ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
सायबर तज्ज्ञ यावर लक्ष ठेवून असतील. प्रजासत्ताक दिनासाठी बहुस्तरावरील सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे. सहा स्तरांवर तपासणी होणार आहे. याखेरीज, बहुस्तरीय बॅरिकेड बसविण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये हजारो सीसीटीव्ही विविध ठिकाणी बसविण्यात आले आहेत.