Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

नांदेड : नांदेडमध्ये महायुतीची भव्य प्रचारसभा होत आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेडकरांना संबोधित करत आहेत. भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, माहूरची रेणुका देवी, मालेगावचा खंडोबा, उणकेश्वर महादेव, विष्णुपुरी काळेश्वर मंदिर यांच्या चरणी नतमस्तक होतो. स्वामी रामानंद तीर्थ स्वातंत्र्यसेनानी यांना प्रमाण करतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. यावेळी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा फोटो एक भाजप प्रेमी त्यांना दिला आहे.

काँग्रेसने एकापेक्षा एक घोटाळे केले. काँग्रेसने फसवणुकीत स्वतःचं रेकॉर्ड मोडलं आहे. काँग्रेसच्या लाल पुस्तकावर संविधान लिहिलं आहे, मात्र ते उघडून पाहिलं नंतर ते कोरी आहे. संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापायचं. कॉंग्रेसवाले देशात बाबासाहेबाचे नाही स्वतःच संविधान चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस वेगळी पुस्तक संविधानाचा मजाक उडवत आहे. काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची द्वेष आहे. संविधानासोबत सगळ्यात पहिला विश्वासघात काश्मीरमध्ये केला होता, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा –  To The Point : गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय केले? आमदार आण्णा बनसोडे यांनी यादीच जाहीर केली!

भाजप आणि महायुतीच्या समर्थनात एक लाट सुरू आहे. आज सगळ्यांच्या तोंडात एकच नारा आहे, महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे…. लोक भाजप आणि महायुती सरकार पुन्हा पुन्हा निवडून देत आहेत. महायुतीला तिसऱ्यांदा संधी दिली आहे. नांदेडचे फुल नव्हतं यामध्ये… यावेळी नांदेडचे फुल पोहचेल का? असं म्हणत नांदेडमधून लोकसभेच्या पोट निवडणुकीत भाजप उमेदवाराला निवडून देणार का?, असा सवाल मोदींनी नांदेडकरांना केला.

10 वर्षात दुष्काळावर काही उपाय योजना केल्या आहेत. मराठवाड्यात 11 सिंचन योजनेला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांचं हित हे आमचं प्राधान्य आहे. नांदेडमध्ये 5 लाखपेक्षा ज्यास्त शेतकऱ्यांना 1 हजार 500 कोटी रुपये दिले आहेत. समृद्धी महामार्गामुळे विकासाला नवी चालना मिळाली आहे. नांदेड ते दिली विमानसेवा सुरू झाली आहे. अमृतसर यात्रा विमानसेवा सुरू होणार आहे. 3 करोड महिलांना लखपती दीदी बनवत आहोत… गावातली माझी दीदी लखपती बनेल. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला महाराष्ट्रातील माता भगिनी आशीर्वाद देण्यासाठी पुढे येत आहेत, असंही मोदी यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button