breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी
दोन दिवसांपूर्वी लस टोचून घेतलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण
लाहोर – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोनच दिवसांपूर्वी लस टोचून घेतली होती. मात्र त्यांना आता कोरोनाची लागण झाली आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केलं आहे.