२३ सप्टेंबरला जगभर दिवस-रात्र प्रत्येकी १२ तासांचे
![On September 23, day and night of 12 hours each across the world](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/23-September-780x470.jpg)
23 September : २३ सप्टेंबर आणि २१ मार्च हा विषुवदिन म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. उद्या शनिवारी ही स्थिती तयार होऊन समान दिवस-रात्र अनुभवता येणार आहे. या विशेष तारखांना खगोलशास्त्रात ‘विषुव दिन’ असे म्हणतात.
दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे निर्माण होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासापेक्षा मोठा व रात्र १२ तासापेक्षा लहान असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस व रात्र समान असते. म्हणजेच १२-१२ तासांचे असते.
हेही वाचा – रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या रक्कमेत १० पट वाढ
पृथ्वीच्या परांचन गतीमुळे या दिवसात दर वर्षाला थोडा फरक पडू शकतो २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो. दोन्हीही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतात. या दोन्ही दिवशी प्रकाशवृत्त उत्तर व व दक्षिण ध्रुवातून जाते, म्हणून २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजे समान असतात.