सोमवारी महाकाय उल्का पृथ्वीजवळून जाणार; गुरुत्वाकर्षणामुळे टक्कर होण्याची शक्यता
न्युयॉर्क | आतापर्यंत आपण जगाचा अंत होणार, जगबुडी होणार, पृथ्वी नष्ट होणार अशी भीती निर्माण करणाऱ्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या असतील. ही भीती आतापर्यंत तरी प्रत्यक्षात घडलेली नाही. पण आता असाच एक गंभीर इशारा नासाने दिला आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, पुढील आठवड्यात २१ मार्च रोजी एक महाकाय उल्का अगदी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याच्यामुळे पृथ्वीला कोणतेही नुकसान होणार नसल्याचे आतापर्यंत सांगितले जात असले तरी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणमुळे त्याची टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वैज्ञानिक त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
हा उल्का महाकाय असल्याने त्याला ”मॉनस्टर प्लानेट किलर “ असे नाव देण्यात आले आहे. हा उल्का जर पृथ्वीवर कोसळला तर संपूर्ण पृथ्वी नष्ट होण्याची शक्यता आहे.या महाकाय उल्कापिंडाला २०१३ बीओ ७६ असेही नाव दिले आहे.याचा आकार ६०० ते १५०० फुट व्यास इतका असेल.हा उल्का याआधी १७ जानेवारी २०१३ रोजी दृष्टीपथात आला होता.त्यानंतर ७ मार्च रोजी त्याचे छायाचित्र काढण्यात आले.त्यावेळी तो पृथ्वीपासून अंदाजे १५ दशलक्ष मैल अंतरावर होता.हा महाकाय उल्का जेव्हा २४ रोजी पृथ्वीजवळ पोहचेल, तेव्हा दोन्हीमधील अंतर केवळ तीन लाख मैल इतके असेल.पण या अंतरात फरक झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.म्हणूनच नासाचे वैज्ञानिक सातत्याने त्यांच्यावर पाळत ठेऊन आहेत.ही उल्का सामान्यपणे ऑनलाईन व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रकल्पांतर्गत पाहता येऊ शकते असे नासाने म्हटले आहे.