breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आता म्युकर मायकोसिस आजारावरील औषधांचा तुटवडा

नागपूर – कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेतून नागपूरकर सावरत नाहीत तोच म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा विळखा शहराला पडला आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यामुळं एक नवं संकट उभं राहिलं असताना आता या आजारावरील औषधांचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोविडवर मात केलेल्या सरासरी १० टक्के रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराची गंभीर लक्षणं दिसत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं साहजिकच या बुरशीजन्य आजाराची दाहकता कमी करण्यासाठी एम्पोटेरिसीन बी, फोटॉन, लिपो सोमॉल यांसारख्या अँटिफंगस औषधांची मागणी पूर्वीच्या तुलनेत २०० पटींनी वाढली आहे.

म्यूकर मायकोसिसचा संसर्ग झालेल्या आणि उपचार सुरू असलेल्या रुग्णांना अन्य काही औषधांबरोबरच शरीराच्या अवयवांवरील बुरशीचा संसर्ग थांबविण्यासाठी इम्युनोसिन अल्फा, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवून प्राणवायूची पातळी वाढण्यासाठी दिलं जाणारं अॅक्टेम्रा या औषधांचीही मागणी वाढली आहे.

कोविडचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत आहेत. त्यामुळं रक्त पातळ करणाऱ्या ‘लो मॉलिक्युलर हिटरीन’ या औषधाचाही बाजारात तुटवडा भासतो आहे. मागणीच्या तुलनेत ही औषधं उपलब्ध होत नसल्यानं आता रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button