न्यूयॉर्क गव्हर्नरवर लैंगिक छळाचा आरोप
![New York governor charged with sexual harassment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/6026b2c0b3c2a8001.jpg)
न्यूयॉर्क – न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्य्रू कुओमो यांच्यावर माजी साहाय्यक महिला कर्मचार्याने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. कार्यालयात एकटे असताना त्यांनी आपल्याला लैंगिक आयुष्याविषयी काही प्रश्न विचारून त्रास दिला, असा आरोप तिने केला आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. शार्लोट बेनेट ही 25 वर्षांची महिला राज्यपाल कुओमो यांच्या स्टेट कॅपिटल कार्यालयात एकटी होती.
त्यावेळी त्यांनी तिला तिच्या लैंगिक जीवनाविषयी काही प्रश्न विचारले होते. त्यात त्यांनी तिला वयस्कर पुरुषासोबत संबंध ठेवले होते का? असा प्रश्न केला होता. ही निराशाजनक घटना 5 जूनला घडली होती, असा गौप्यस्फोट तिने केला आहे. दरम्यान, यात आपला कोणताही गैरहेतू किंवा उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण कुओमा यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बेनेट कोरोना काळात राज्यपालांच्या कार्यालयात सहाय्यक आणि आरोग्य धोरण सल्लागार म्हणून काम करत होती. मात्र नंतर राज्यपालांनी अधिकाराचा गैरवापर करत आपल्याला त्रास दिला असल्याचा आरोप तिने केला आहे.