TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

मॉस्को-दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची अफवा; पोलीस तपासात स्पष्ट

नवी दिल्ली ।
रशियाची राजधानी मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. बॉम्ब ठेवल्याच्या फोननंतर तातडीने विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

रशियाची राजधानी मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. बॉम्ब ठेवल्याच्या फोननंतर तातडीने विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. मात्र, दिल्ली पोलिसांच्या तपासात बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी सकाळी रशियाची राजधानी मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने अनेक तास खळबळ उडाली होती. बॉम्बच्या माहितीनंतर विमान दिल्लीत उतरवत सर्व क्रू मेंबर्स आणि विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या विमानामधून एकूण 386 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास मॉस्कोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी देणारा फोन आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून विमानतळाची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अजूनही विमानाची तपासणी सुरू आहे.

विमान पहाटे 3.20 वाजता मॉस्कोहून दिल्ली विमानतळावर पोहोचणार होते. मॉस्कोहून टर्मिनल 3 (T3) ला दुपारी 3:20 वाजता येणार्‍या फ्लाइटमध्ये सकाळी 11:15 वाजता बॉम्ब असल्याची माहिती मिळाली तेव्हा विमानात बॉम्ब आहे. याप्रकरणी तपास सुरू असून विमानात बॉम्ब असल्याची माहिती कोणी दिली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. ज्या व्यक्तीने विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली त्याचा शोध घेतला जात असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button