Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीतील विवेक विहारमध्ये भीषण आग; नऊ जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

Delhi Fire | देशाची राजधानी दिल्लीतील विवेक विहार भागात रविवारी पहाटे चार मजली निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासानुसार, वातानुकूलित यंत्रणेच्या (AC) स्फोटामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ३ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. काही वेळातच आगीने इमारतीचा दुसरा, तिसरा आणि चौथा मजला वेढला. गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही.

हेही वाचा

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; उद्या होणार अधिकृत घोषणा

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जवानांनी अथक प्रयत्न करून इमारतीत अडकलेल्या सुमारे १० ते १५ जणांना सुरक्षित बाहेर काढले.

या दुर्घटनेत दुसऱ्या मजल्यावरून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर जिन्याजवळून तीन जणांचे मृतदेह सापडले. जीव वाचवण्यासाठी पळत असताना ते अडकले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. आणखी एका व्यक्तीचा मृतदेह पहिल्या मजल्यावरून सापडला.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button