Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

मराठा आरक्षण: विशेष अधिवेशनाच्या मागणीसाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय धरणे आंदोलन!

मुंबई |

मराठा आरक्षण प्रश्नी निर्णय घेण्यासाठी राज्याचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करावे, या मागणीसाठी कोल्हापुरात सर्वपक्षांनी आज (शुक्रवार) धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. राज्यात मराठा आरक्षण प्रश्नाची व्याप्ती वाढत चालली आहे. या आंदोलनाला कोल्हापूरातून पाठिंबा मिळत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन आयोजित करावे, अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षीय, विविध मराठा संघटनां सहभागी झाल्या होत्या होत्या.

आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज समरजित राजे घाटगे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील,आमदार चंद्रकांत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी खासदार धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, बाबा पार्टे यांच्यासह अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला. पालकमंत्री सतेज पाटील येथे भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मराठा आरक्षण तातडीने मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. तर काही आंदोलकांनी काळी वस्त्रे परिधान करीत निषेध नोंदवला.

वाचा- “रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण ठाकरे सरकार मागे पुढे पाहणार नाही”- भाजप

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button