breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ममता बॅनर्जींनी घेतली आमदारकीची शपथ

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अन्य दोन आमदारांचा आज विधानसभा सदस्यत्वाचा शपथविधी झाला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

पश्चिम बंगालमध्ये ३० सप्टेंबरला पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यात भवानीपूर विधानसभा मतदार संघातून ममता बॅनर्जी निवडून आल्या होत्या. त्यांच्याबरोबरच तृणमूल काँग्रेसचे अमीरुल इस्लाम आणि जाकिर हुसैन हे अन्य दोन आमदारही पोटनिवडणुकीत निवडून आले होते. त्यांचाही विधानसभेचे सदस्य म्हणून आज शपथविधी झाला. राज्यपालांनी या तिघांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. यामुळे ममतांच्या मार्गातील अडचण दूर झाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button