‘मतं द्या किंवा देऊ नका पण माझ्या अंत्यसंस्काराला जरूर या’; काँग्रेस नेत्याची भावनिक साद
![Mallikarjun Kharge said vote or not but come to my funeral](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Mallikarjun-Kharge-780x470.jpg)
Mallikarjun Kharge | लोकसभा निवडणुकीमुळे संपुर्ण देशाचं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच पक्षाकडून प्रचार आणि रॅली यांचा धुरळा उडाला आहे. अशातच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. मतं द्या किंवा देऊ नका पण माझ्या अंत्यसंस्काराला जरूर या! असं ते एका प्रचारसभेत म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार. एखाद्या पदावरुन निवृत्ती घेतली जाऊ शकते. मात्र आपल्या तत्त्वांपासून आणि सिद्धांतापासून कधीही निवृत्ती घेऊ नये. भाजपा आणि संघाच्या विचारधारेचा पराभव करण्यासाठीच मी राजकारणात आलो.
हेही वाचा – बीड दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही मत दिलं नाहीत तर मला वाटेल की कलबुर्गीत माझं काहीही स्थान राहिलेलं नाही. मी तुमचा विश्वास जिंकू शकलो नाही. मी तुम्हाला एक आवाहन करु इच्छितो की भले तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या किंवा देऊ नका, मात्र तुम्हाला माझ्या अंत्यसंस्काराला यावं लागेल, त्यावेळी नक्की या, असं म्हणत खरगे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.