महाकुंभमेळ्यात वृद्ध व्यक्तीला शाही स्नान करताना मिळालं एक ‘चमत्कारी’ कासव
कासवाच्या अंगावर इंग्रजी अक्षरे लिहिलेली आहेत
![Mahakumbh Mela, old man, royal, bathing, miraculous, turtle,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/mahakumbha-780x470.jpg)
राष्ट्रीय : प्रयागराजनगरीत महाकुंभ मेळा सुरू आहे. कुभमेळा हा हिंदू धर्मातील पवित्र कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की, या काळात पवित्र नद्यांचे पाणी अमृत बनते. त्यामुळे महाकुंभ मेळ्यात भाविकांना गंगा, यमुना आदि नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. त्यामुळे प्रयागराजमध्ये भाविकांचा ओघ सतत वाढत आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत १.४ कोटी भाविकांनी येथे स्नान केले. सध्याही भाविकांची आवक सुरूच आहे. पण या प्रयागराज नगरीत काही दिवसांपूर्वी असं काही घडलं होतं, ज्याची चर्चा अजूनही होत आहे. दरम्यान महाकुंभ मेळ्यात आलेल्या वृद्ध व्यक्तीने जेव्हा त्रिवेणी संगमात शाही स्नान करत असताना अशी एक गोष्ट सापडली की ती पाहून कोणाचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. जेव्हा लोकांनी ती गोष्ट पहिली तेव्हा त्यांच्या तोंडून एकच गोष्ट बाहेर पडली – अशक्य!
महाकुंभमेळ्यात एक वृद्ध व्यक्ती त्रिवेणी संगमात शाही स्नान करून परताना त्यांच्या पायाला काही हालचाल जाणवली. तेव्हा त्यांनी ती गोष्ट पाण्यातून बाहेर काढली ते पाहून सगळेच शॉक झाले. त्या वृद्ध व्यक्तीने सोशल मीडियावर दावा केला की, ते संगमात शाही स्नान करताना त्यांना एक कासव सापडले ज्याच्या अंगावर इंग्रजी अक्षरे लिहिलेली आहेत. त्यांनी हे कासव सोबत आणले असून ते पाहण्यासाठी आता दूरदूरवरून लोकं येत आहेत.
हेही वाचा : सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल
कासवाच्या शरीरावर काय लिहिले आहे?
काही दिवसांपूर्वी प्रयागराजला शाही स्नान करण्यासाठी गेलेल्या एका वृद्धा व्यक्तीने सांगितले की, तिथल्या संगमात स्नान करत असताना अचानक त्यांना पायाजवळ हालचाल जाणवली. पाण्यात हात घातल्यावर त्यांना एक कासव असल्याचे जाणवले. जेव्हा त्यांनी त्या कासवाला पाण्यातुन बाहेर काढून पहिले तेव्हा त्याच्या शरीरावर ए, बी, सी, डी अशी काही इंग्रजी अक्षरे पिवळ्या रंगात लिहिलेली होती. त्यानंतर त्या कासवाला पाहण्यासाठी तेथे गर्दी जमली होती.
लोक याला अंधश्रद्धा मानत आहेत
एकीकडे महाकुंभात चमत्कारिक कासव सापडल्याचे तो वृद्ध व्यक्ती सांगत असताना दुसरीकडे अनेकजण याला अंधश्रद्धा मानत आहेत. कासवाच्या शरीरावर काही पिवळ्या खुणा दिसतात, परंतु काही लोकं ते फक्त एक पॅटर्न मानत आहेत, जे अक्षरांसारखे दिसते. तर या कासवाला पाहून अनेकजण लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार करत आहेत असे त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तर काही जण हा निसर्गाचा चमत्कार असल्याचे मानत आहेत.
अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत
या संपूर्ण प्रकरणावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण याला महाकुंभ दरम्यान घडणारी एक चमत्कारिक घटना मानत आहेत, तर काहीजण हा निव्वळ योगायोग किंवा फसवणूक मानत आहेत. कासवाची चर्चा रंगली असून त्याला पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. अखेर, या प्रकरणामुळे लोकांमध्ये विश्वास आणि शंका यांच्यात फूट पडली असून, या घटनेबाबत काय आणि कोणत्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे बाकी आहे.