breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘Maha budget २०२०’ : शेतीसाठी दिवसा पाणी पुरवठा करण्यावर भर- अर्थमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प विधानसभेत सादर होत आहे. तत्पुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, अर्थराज्यमंत्री शंभूराजे देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, यशोमती ठाकूर यांनी विधिमंडळ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

राज्याचा घसरलेला विकास, दरडोई उत्पन्न, परकी गुंतवणुकीत झालेली पीछेहाट यामुळे राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे आव्हान ठाकरे सरकारसमोर आहे. उद्योग, सेवा क्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे.

तर, आर्थिक मंदीमुळे राज्याचा जीडीपीही ७.५ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्पाचे वाचन करतील.

  • शेतीसाठी दिवसा पाणी पुरवठा करण्यावर भर- अर्थमंत्री
  • केंद्राकडून राज्याला जीएसटीतला वाटा मिळण्यास विलंब- अर्थमंत्री
  • आर्थिक मंदीमुळे उद्योगधंदे अडचणीत; कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर तणाव- अर्थमंत्री
  • सरकारकडून फार अपेक्षा नाहीत. यांनी केवळ सर्व निर्णयांना, प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम केलंय- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
  • अर्थसंकल्पाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू
  • अर्थसंकल्प अनेकांना न्याय देणारा, सर्वांना सोबत नेणारा असेल- बाळासाहेब थोरात
  • ठाकरे सरकार जनतेला न्याय देऊ शकत नाही; त्यामुले त्यांच्याकडून आम्हाला विशेष अपेक्षा नाही : मुनगंटीवार

राज्य सरकारणे कामात समन्वय रहावा, यासाठी समिती स्थापन केली आहे. मात्र केंद्राकडून मिळणारा अल्प निधी आणि राज्यावरील वाढती कर्जे, महसुली तुट भरून काढण्यासाठी ठाकरे सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button