breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Loksabha 2019 : भाजपला या चार राज्यांकडून मोठी अपेक्षा

दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून कोण बाजी मारणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरु होईल. सर्वच एक्झिट पोल्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवला आहे.

भाजपाला सर्वाधिक अपेक्षा उत्तर भारताकडून आहे. २०१४ मध्ये भाजपाने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये क्लीनस्वीप केले होते. या चार राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण १७४ जागा आहेत. मागच्यावेळी उत्तर प्रदेशात भाजपाने ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांच्यासमोर सपा-बसपा आणि आरएलएडी या महाआघाडीचे आव्हान आहे. यंदा सुद्धा सत्तेवर परतण्यासाठी भाजपाला या चार राज्यांकडून मोठया अपेक्षा आहेत.

ऑस्ट्रेलियाच भाजपाच्या विजयाचे सेलिब्रेशन

एक्झिट पोलचे आकडे चुकीचे ठरु शकतात यासाठी ऑस्ट्रेलियाचे उदहारण दिले जात होते. पण आता त्याच ऑस्ट्रेलियाच्या सिडनी आणि मेलबर्न शहरातील भाजपा समर्थकांनी भाजपाच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरु केले आहे. भाजपा २९२ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसताच सेलिब्रेशनला सुरुवात झाली.

साध्वी प्रज्ञा ५० हजार मतांनी आघाडीवर

भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. साध्वी प्रज्ञा ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत. निश्चित माझा विजय होईल, माझ्या विजयात धर्माचा विजय होईल. अधर्माचा नाश होईल. मी भोपाळच्या जनतेची आभारी आहे.

अमेठीत स्मृती इराणींची आघाडी

उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यात अटीतटीचा सामना सुरु आहे. प्रत्येक फेरीच्या मतगणनेनंतर आकडे सातत्याने बदलत आहेत. सध्या स्मृती इराणींनी राहुल गांधींना मागे टाकत ४,३०० मतांची आघाडी घेतली आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघ गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजला जातो.

भाजपा अध्यक्ष अमित शाह सव्वा लाख मतांनी आघाडीवर

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून १ लाख २५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे. मेहबूबा मुफ्ती तिसऱ्या स्थानावर आहे. छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा असून भाजपा नऊ आणि काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button