तामिळनाडूतील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढवला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/1619427835-9911.jpg)
चेन्नई – तामिळनाडूमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यात एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून लॉकडाऊनच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहेत. 24 मे ते 31 मे या दरम्यान हा लॉकडाऊन लागू असणार आहे.
लॉकडाऊन काळात केवळ मेडिकल, पशु चिकिस्ता दुकाने, दूध पुरवठा आणि वृत्तपत्र सेवा सुरू राहतील. तसेच माध्यम सेवा या काळात सुरूच राहतील. तसेच एटीएम आणि पेट्रोल पंपही सुरू राहतील. तसेच अत्यावश्यक सेवांसाठी असलेली वाहतूक व्यवस्थाही सुरू राहणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय कारणासाठी जर कोणाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल किंवा जिल्ह्यांतर्गत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पासची आवश्यकता असेल. तर कृषींच्या कामांसाठीची वाहतूक व्यवस्थाही सुरू राहणार आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने लोकांना लॉकडाऊन काळात भाजीपाल्याचा पुरवठा कसा करता येईल याचे नियोजन करावे असा आदेशही मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिला आहे.