चीनमध्ये लॉकडाऊन; सरकार सतर्क, मांडवियांच्या अध्यक्षतेखाली बैठक
बीजिंग | चीनमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून अनेक प्रांतात लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. तसेच हॉंगकॉंग आणि सिंगापूरमध्येदेखील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आपले सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत अलर्ट जारी केला आहे. देशातील कोव्हिड 19 परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वच स्तरावर कोरोना नियमांचे काटेकोर पालन होईल याबाबत आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
या बैठकीला आरोग्य सचिवांसह सरकारचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. भारतात सध्या कोरोनाची साथ अटोक्यात आहे, मात्र भविष्यात ती वाढू नये यासाठी काय प्रयत्न करायला हवेत यावर देखील या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, देशात बुधवारी कोरोनाच्या 2,876 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 32,811 वर पोहोचला आहे.