breaking-newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडी
#Lockdown: लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ८०० कोटींची गुंतवणूक
मोबाईलचं उत्पादन करणारी ‘लावा’ या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून शुक्रवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.