breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#LockDown | देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढणार ?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता हा कालावधी संपण्यासाठी जवळपास आठवडाभराचा काळ उरला आहे. Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर आळा घालण्यासाठी म्हणून हा उपाय योजण्यात आला. पण, कोरोनाची दहशत अद्यापही कमी झाल्यामुळे येत्या काळात देशातील कोरोना प्रभावित अशा किमान सात राज्यांमध्ये तरी लॉकडाऊनचा काळ वाढण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.

२१ दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपला तरीही त्यापुढे ही परिस्थिती कायम राहणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या राज्यातील ही परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचं समर्थन केलं. शिवाय महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड, झारखंड या राज्यांत लॉकडाऊनचा काळ आणखी काही दिवसांनी पुढे जाऊ शकण्याला आणि पूर्णपणे नियम शिथिल न करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button