ताज्या घडामोडीमराठवाडा

भाजपाचे खासदार प्रताप पाटलांना धमकीचे पत्र

नांदेड | भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धमकीचे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली संजय बियाणी यांच्या हत्येचा शोध लागला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन त्यांना धमकी आलेलं पत्र आणि निवेदन दिले.

या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात अली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येने नांदेड हादरले होते. बियाणी यांच्या हत्येला 15 दिवस झाले अजून बियाणी यांच्या हत्येचा तपास लागला नाही. नांदेडच्या पोलिसांवर माझा विश्वास नाही असा आरोप खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे सातत्याने करीत आहेत. बियाणी यांच्या हत्येचा तपास सीबीआय कडे देण्याची मागणी खासदार चिखलीकर यांनी केली आहे.

या पत्रात नेमकं काय लिहल ते पाहा…

प्रताप पाटील चिखलीकर माहीत आहे ना मी कोण आहे. जेवढं माझ्या माणसांना सतवशील तेवढंच माझे माणसं तुझ्या घरचे लोक आणि मुलगा या सर्वांचा राम नाम सत्य है…
माझ्या माणसाचा फोन येत आहे तुला मारण्यासाठी. माझा माणूस म्हणत आहे १० करोड रुपय आणून दे ८ दिवसात.नाही तर तुला माहीत आहे. माझ्या बंदुकीचा टिगर दाबल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाही. नांदेड मध्ये किती लोकांना मारलं आहे हे तर तुला माहीत आहे. औरंगाबाद मध्य थोड्याने वाचला नाही तर तुझा तिथंच गेम झाला असता. आता माझ्या पासून वाचू शकत नाहीस .मी सांगितलेली रक्कम दे. बदमाशी करू नको पोलिसांना सांगू नको सांगितलास तर तुझा खेळ खलास. तुझ्या सारख्या मोठ्यांना वर पाठवलं आहे. तुझी काय औकात आहे. इथं दिल्ली मध्य कितीही सुरक्षा लाव तुझे चमचे राहतात. त्यांना पण सांगून ठेव. तुला तुझा जीव पाहिजे की मरण हे तू ठरव. माझं पोलीस काहीच करू शकत नाहीत. एका आठवड्यात माझ्या माणसाकडे पैसे दे नाही तर माझी कहाणी माहीत आहे ना,असा या पत्रात उल्लेख आहे.

दरम्यान, चिखलीकर यांना आलेल्या धमकीच्या पत्राचा अद्याप पोलिसांना सुगावा लागला नाही. चिखलीकर यांना आलेलं निनावी पत्र आज चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या पत्रामुळे पुन्हा नांदड मध्य खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button