प्रियकरानेच प्रेयसीचे केले तुकडे-तुकडे, गुगल सर्च हिस्ट्रीन सर्व वास्तव समोर
![kerala suchitra pillai murder case boyfriend prashant nambiar google search history revealed the murder secrets](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Kerala-Suchitra-Pillai-Murder-Case-780x470.jpg)
केरळ : काही महिन्यापुर्वी श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. लिव्ह-इन जोडीदार आफताब पुनावाला याने तिची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. जवळपास सहा महिन्यानंतर या हत्याकांडाचा खुलासा झाला होता. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची हत्या केली आहे. त्यानंतर तिचे तुकडे करत हत्येचे पुरावेही नष्ट केले. मात्र गुगल सर्च हिस्ट्रीन सर्व वास्तव समोर आलं आहे.
केरळच्या पलक्कड जिल्ह्यात संगीत शिक्षकाने आपल्या प्रेयसीची हत्या केली. २०२० चं हे प्रकरण आहे. प्रशांत नांबियारने त्याची प्रेयसी सुचित्रा पिल्लई हिच्या प्रेताचे तुकडे केले. आणि सगळे पुरावेही नष्ट केले. पोलिसांनी मात्र गुगल सर्च हिस्ट्रीच्या आधारे हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं आहे.
हेही वाचा – कर्नाटकचं ठरलं! सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री
प्रशांत नांबियारने त्याची प्रेयसी सुचित्रला ठार करण्यासाठी गुगलवर एक मजकूर शोधला होता. एका अध्यात्मिक गुरूने त्याच्या पत्नीला कसं मारलं? How Did Spiritual Guru Killed his wife? असं गुगलला सर्च केलं होतं. त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावतात हे देखील गुगलवर शोधलं होतं. तर त्याने काही हत्या करण्याआधी काही हत्यांवर आधारीत चित्रपटही पाहिले होते.
या प्रकरणात गुगल सर्च हिस्ट्रीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली. सोमवारी प्रशांत नांबियारला कोल्लमच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. नादुविलक्कर गावात राहणाऱ्या सुचित्रा पिल्लईच्या हत्याप्रकरणी कोर्टाने प्रशांत नांबियारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच त्याला अडीच लाखांचा दंडही ठोठावला आहे.