breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Jio चा नवा प्लान, ५९८ रुपयांत रोज 2GB डेटा आणि कॉलिंग

नवी दिल्ली– रिलायन्स जिओ ने ५९८ रुपयांचा नवा प्लान आणला आहे. हा कंपनीचा रोज २ जीबी डेटाचा प्लान आहे. यात ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते. सोबत युजर्संना डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशीप सुद्धा मिळते.

जिओचा ५९८ रुपयांचा प्लान
कंपनीने याला क्रिकेट प्लान नाव दिले आहे. ५९८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी २ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. रोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना एकूण ११२ जीबी डेटाचा वापर करता येवू शकतो. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

प्लानमध्ये एका वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीची मेंबरशीप मिळते. याची किंमत ३९९ रुपये आहे. आयपीएल २०२० जवळ आल्याने जिओचा हा प्लान अनेकांना आकर्षित करू शकतो. ५९८ रुपयांच्या नवीन प्लानसोबत कंपनी आता चार प्लान ४०१ रुपये, ५९८ रुपये, ७७७ रुपये आणि २५९९ रुपये झाले आहेत. ज्यात Disney+ Hotstar VIP मेंबरशिप दिली जाते.

४०१ रुपयांचा प्लानः याची वैधता २८ दिवसांची आहे. यात रोज ३ जीबी डेटा, जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, २ हजार नॉन जिओ मिनिट्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.

७७७ रुपयांचा प्लानः याची वैधता ८४ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा, जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, २ हजार नॉन जिओ मिनिट्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.

२५९९ रुपयांचा प्लानः याची वैधता ३६५ दिवसांची आहे. यात रोज २ जीबी डेटा, जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, २ हजार नॉन जिओ मिनिट्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button