breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

व्हॉट्सॲपच्या मदतीने भरता येणार ITR, जाणून घ्या नेमकं कसं?

ITR | आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. या तारखेनंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला दंड भारावा लागेल. त्यामुळेच सध्या आयटीआर भरण्यासाठी अनेकांची लगबग चालू आहे. तुम्हाला आता व्हॉट्सॲपच्या मदतीने सुद्धा ITR भरता येणार आहे.

ClearTax ने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आयटीआर भरण्याची सोय करून दिली आहे. व्हॉट्सॲपच्या मदतीने तुम्हाला ITR भरायचा असेल तर तुम्हाला अगोदर क्लियर टॅक्सच्या क्रमांकावर Hi असा मेसेज टाकावा लागेल. नंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल.

हेही वाचा      –      ‘पुण्याचे पालकमंत्री येथे नसतानाही धरण वाहिलं’; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

तुम्हाला एकूण दहा भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानंतर तुम्ही चॅटिंगच्या माध्यमातून पॅन नंबर, आधार नंबर, बँकेचे डिटेल्स अशी महत्त्वाची माहिती क्लियर टॅक्सला द्यायची आहे. त्यानंतर AI बॉटच्या मदतीने तुम्हाला आयटीआर फॉर्म १ किंवा आयटीआर फॉर्म ४ यापैकी तुम्हाला लागू होणारा फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या. त्यानंतर डिटेल्स कन्फॉर्म करून घ्या. व्हॉट्सॲपद्वारे सुरक्षित पेमेंट करा. तुम्हाला पोचपावती क्रमांकासह पुष्टी संदेश मिळेल.

अधिक माहितीसाठी, https://cleartax.in/s/whatsapp-itr-filing ला भेट देऊ शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button